बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचा बुधवारी ३०वा वाढदिवस झाला. या आघाडीच्या अभिनेत्रीला वाढदिवशी बॉलीवूडकरांनी, सोशल मीडियावरून तिच्या असंख्य चाहत्यांनी आपापल्यापरिने शुभेच्छा दिल्या परंतु, आपल्या कथीत प्रियकर रणबीर कपूरने कतरिनाला खास ‘सरप्राईज’ दिले.
दोघेही आपापल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असले, तरी वेळातवेळ काढून दोघांनी फ्रान्समधील कोर्सिका बेटावर काही वेळ घालविला आणि कतरिनाचा बर्थ डे’ साजरा केला. रणबीर सध्या दिग्दर्शक इमतियाज अलीच्या ‘तमाशा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात, तर कतरिना बहुप्रतिक्षीत ‘बँग बँग’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीरने कतरिनाच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर १५ जुलैपासूनच आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला दांडी मारली आणि दोघांनी फ्रान्समधील या निसर्गरम्य बेटावर एकत्र वेळ घालविला.
याआधी रणबीर-कतरिना एक्स मॅनच्या स्क्रिनिंगला एकत्र दिसले होते. बॉलिवूड स्टार्ससाठी लाइट बॉक्समध्ये या हॉलिवूड चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते
कतरिनाला ‘बर्थ डे सरप्राईज’; फ्रान्समधील कोर्सिका बेटावर घेऊन गेला रणबीर!
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचा बुधवारी ३०वा वाढदिवस झाला. या आघाडीच्या अभिनेत्रीला वाढदिवशी बॉलीवूडकरांनी, सोशल मीडियावरून तिच्या असंख्य चाहत्यांनी आपापल्यापरिने शुभेच्छा दिल्या परंतु,
First published on: 17-07-2014 at 02:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor celebrates katrinas birthday in an french island