बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर सध्या आगामी ‘बेशरम’ चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात व्यस्त आहे. पण, गेले काही महिने रणबीर त्याच्या चित्रपटांपेक्षा कतरिनासोबतच्या स्पेनमधील फोटोंमुळे जास्त चर्चेत आहे. शनिवारी रणबीरचा ३१वा वाढदिवस झाला. त्या अनुषंगाने पत्रकारांनी त्याला बेशरमच्या प्रमोशनवेळी कतरिनाने वाढदिवसाची काय भेट दिली? असा प्रश्न केला. इंग्रजीमध्ये एक वाक्यप्रचार आहे, ‘माइंड यूअर ओन बिझनेस’. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, असे पत्रकारांवर रागावलेला रणबीर म्हणाला.
तसेच, कतरिना-रणबीर पुन्हा हॉलीडेसाठी परदेशी जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याबाबत त्याला विचारले असता, फोटो प्रदर्शित झाल्यावर तुम्हाला कळेलच.. मी काय म्हणणार, असे रणबीरने उत्तर दिले आणि याव्यतिरीक्त त्याने जास्त काही बोलणे टाळले.

Story img Loader