बॉलीवूडची चर्चित जोडी रणबीर-कतरिना हे त्यांच्या प्रेमसंबंधाचे गुपित लपविण्याचा प्रयत्न करत आले आहेत.  मात्र, अनेकवेळा ते एकत्र दिसल्याने त्यांच्या या अजब प्रेमाची गोष्ट सर्वांसमोर आली आहे. १६ जुलैला कतरिनाचा वाढदिवस झाला. त्यापूर्वी हे प्रेमीयुगुल स्पेन आणि श्रीलंकेला हॉलीडेसाठी गेले होते. तेव्हा हे दोघेही इबीझा येथील एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये तसेच, स्पेनमध्ये समुद्रकिनारी एकत्र वेळ घालवताना आढळले. सुट्टीवरून परत आल्यावर ‘शीप ऑफ थिसस’ आणि ‘डी-डे’ या चित्रपटांच्या स्क्रिनिंगवेळी देखील हे दोघे एकत्र दिसले होते.
‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी रणबीर-कतरिना जवळ आले. तसेच लंडन दौ-यावर असताना कतरिना आणि नीतू सिंग एकत्र डिनर करताना आढळल्या होत्या. त्यामुळे नीतू सिंगचेही कतरिनाशी चांगलेच जुळत असल्याचे दिसते.
छायाचित्र सौजन्य- स्टारडस्ट

Story img Loader