बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान हा सचिन तेंडुलकरचा खूप मोठा चाहता आहे. सचिन तेंडुलकर कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना आज खेळत आहे. त्यामुळे सचिनचा कसोटी क्रिकटेमधील शेवट गोड व्हावा अशी आमिरची इच्छा आहे.
आमिरने सचिनच्या २००व्या कसोटीचे सूत्रसंचालन करण्यासाठी आज वानखेडेवर वर्णी लावली. यावेळी तो लगानचा दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरसोबत दिसला. तसेच, त्याने नंतर हर्षा भोगले आणि रवी शास्त्री यांच्याशी संवाद साधला. आमिर म्हणाला की, या सामन्याकरिता मी माझे लकी टी-शर्ट परिधान केले आहे. इतकेच नाही तर पाचही दिवस मी हेच टी-शर्ट घालणार आहे.
२०११ सालातील भारत-पाकिस्तान उपांत्य सामना आणि श्रीलंकेसोबतच्या अंतिम सामन्यावेळी मी हेच टी-शर्ट घातले होते. सचिन हा परफेक्ट आहे, असेही तो म्हणाला.
आमिरव्यतिरीक्त सचिनची पत्नी अंजली, मुलगी सारा, मुलगा अर्जुन आणि भाऊ अजीत हेदेखील स्टेडियमवर उपस्थित होते.
सचिन मेनियाः आमिर घालणार पाच दिवस एकच टी-शर्ट
बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान हा सचिन तेंडुलकरचा खूप मोठा चाहता आहे.
First published on: 14-11-2013 at 02:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar mania aamir khan to wear same t shirt for 5 days