सतत कामात गर्क असलेला बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानने ‘फॅन’ प्रतीच्या बांधिलकीसाठी १५ तास दिले. या विषयीचा अनुभव व्यक्त करताना समाधान मिळाल्याचे तो म्हणाला. मनिष शर्मा दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित ‘फॅन’ चित्रपटात बॉलिवूडचा हा बादशाह एका चाहत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. टि्वटरवरील संदेशात तो म्हणतो, ‘फॅन’मघील १५ तासाचे समाधानकारक काम संपवले. माझ्याबरोबच्या चांगल्या वागणूकीसाठी आणि हास्यविनोदासाठी मनिष तुला आणि तुझ्या ‘फॅन’ टीमला धन्यवाद… हा चित्रपट आपल्या चाहत्यांसाठी समर्पित असल्याचे शाहरूखने म्हटले आहे. अलीकडेच प्रसिध्द झालेल्या शाहरूख खानच्या ‘एट पॅक अॅब्स’ छायाचित्राने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ‘फॅन’ हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. माझ्यासाठी चाहते कुटुंबाचा एक भाग आहेत. मलासुध्दा तुमच्या इतके चांगले व्हायचे आहे, अशा शब्दात चाहत्यांविषयीच्या भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले होते.

Story img Loader