‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ शो मध्ये गुत्थीची भूमिका करणारा अभिनेता सुनील ग्रोवर शोमध्ये परततोय. गेल्यावर्षी त्याने हा शो सोडल्यानंतर तो वादाच्या भोव-यात सापडला होता. त्यानंतर त्याने ‘मॅड इन इंडिया’ शो सुरू केला. मात्र त्या शोला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलने त्याच्या परतीच्या भागाचे चित्रीकरण केले आहे. यावेळी तो विविध भूमिका साकारताना दिसेल. मात्र आता तो गुत्थी नाही बिट्टू शर्माच्या (कपिल शर्मा) सास-याची भूमिका साकारेल. त्यानंतर शोच्या गरजेप्रमाणे तो विविध भूमिका करणार आहे. सदर शोच्या निर्मात्यांशी झालेल्या काही वादांमुळे सुनीलने गेल्या वर्षी हा शो सोडला होता. त्यानंतर त्याने गुत्थी सारखी चुटकीची भूमिका ‘मॅड इन इंडिया’मध्ये साकारली. मात्र, प्रेक्षकांचा त्याला हवातसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा शो अवघ्या चार महिन्यांतच बंद पडला. दरम्यान, कपिलच्या शोमध्येही सगळं काही ठीक सुरु नव्हतं. सुनील शोमधून बाहेर पडल्यानंतर ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ चा टीआरपी घसरला. त्यानंतर याच्या निर्मात्यांनी तीच भूमिका गौरव शर्माकडून करून घेण्याचा प्रयत्न केला. अखेर, हा शो बंद पडण्याची वेळ आली कारण कपिल शर्माही बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यात व्यस्त होऊ लागला. पण, कपिलने चित्रपटांपेक्षा या शोला प्राधान्य दिले असून चित्रपटांना जरा बाजूला सारले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा