‘होणार सून मी त्या घरची’ या मालिकेमुळे सर्वाच्या मनामध्ये घर करून राहिलेले श्री आणि जान्हवी हे दोघेही शनिवारी लग्नाच्या बेडीमध्ये अडकले.
जान्हवी ऊर्फ तेजश्री प्रधान हिने श्री ऊर्फ शशांक केतकर याच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. हे दोघे जण खऱ्याखुऱ्या जीवनामध्येही जोडीदार झाली.
सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथील गुलमोहोर हॉल येथे सकाळी ९ वाजून २ मिनिटे या मुहूर्तावर श्री आणि जान्हवी हे वैदिक पद्धतीने विवाहबद्ध झाले. ‘होणार सून मी त्या घरची’ असे म्हणत तेजश्री प्रधान ही केतकरांची सून झाली.
वैदिक पद्धतीने झालेल्या या विवाह समारंभास ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह मालिकेतील कलाकार उपस्थित होते.

Story img Loader