मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान जसा त्याच्या कामातील परफेक्शनसाठी प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच अनेक चित्रपटातील त्याच्या विविध रूपांसाठी देखील प्रसिद्ध आहे. आमिरने ‘धूम ३’ चित्रपटातील त्याच्या लूकवर खूप मेहनत घेतलेली दिसते. चित्रपटातील साहिरची व्यक्तिरेखा हुबेहूब साकारण्यासाठी पिळदार शरीरयष्टीबरोबर योग्य केशरचनेसाठीदेखील त्याने मेहनत घेतली.
चित्रपटातील इतर व्यक्तिरेखांपेक्षा आपली व्यक्तिरेखा उठून दिसावी, यासाठी त्याने व्यक्तीरेखेसंदर्भातील छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा योग्यप्रकारे पार पडतील, यावर लक्ष दिले. चित्रपटात साहिर कसा दिसेल, यासंदर्भातील विविध गेटअप आमिरवर पडताळून पाहण्यात आले. यातील एका लूकमध्ये आमिरच्या केसांचा रंग सोनेरी आणि गडद तपकिरी रंग करण्यात आला. ‘दिल चाहता है’ चित्रपटातील आमिरची प्रसिद्ध हेअरस्टाईल साकारणारा केशरचनाकार अवान कॉन्ट्रॅक्टरची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती.
चित्रपटकर्त्यांद्वारे ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये सोनेरी केसांचा लूक आमिरने जवळजवळ निश्चित केल्याचे दिसून येते. या लूकसाठी केशरचनाकाराची मनधरणी करतानादेखील तो दिसतो. केशरचनाकाराच्या मते ही केशरचना आमिरला चांगली दिसत नसल्याने तो आमिरच्या मताशी असहमती दर्शवितो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा