‘एमियोट्रॉफिक लेट्रल स्केलेरॉसिस’ (एएलएस) या आजाराने ग्रस्त असलेला अमेरिकेचा बेसबॉलपटू पीट फ्रेट्सने सोशल मिडियावर आपला व्हिडिओ अपलोड केला. तेव्हापासून, ‘आइस बकेट चॅलेंज’ची सुरुवात झाली. ‘एएलएस’ या अत्यंत गंभीर अशा मेंदूच्या विकाराबाबत जनजागृती व्हावी, त्याचप्रमाणे या व्याधीच्या संशोधनासाठी निधी उभारला जावा आणि या व्याधीने ग्रस्त असलेल्या रुग्णांकडे जगभरातील लोकांचे लक्ष केंद्रीत व्हावे, यासाठी ‘एएलएस आइस बकेट चॅलेंज’ची सुरुवात झाली. बर्फाने भरलेली गार पाण्याची बादली स्वतःच्या डोक्यावर ओतून घेणे आणि सदर चॅलेंजसाठी आणखीन तीन व्यक्तींची नावे सुचविणे असे या चॅलेंजचे स्वरूप आहे. ज्यांच्या वाट्याला हे आव्हान येते त्यांनी पुढील २४ तासात बर्फाने भरलेल्या गार पाण्याची बादली डोक्यावर ओतून घेणे अथवा कमीत कमी १00 अमेरिकन डॉलर्स ‘एएलएस’ या व्याधीवरील संशोधनकार्यासाठी देणगी म्हणून देणे अपेक्षित आहे. आव्हान स्वीकारून देणगी देण्याचा पर्यायदेखील यात अंतर्भूत आहे. जगभरातील अनेक मान्यवर स्वतःच्या अंगावर बर्फाच्या गार पाण्याने भरलेली बादली ओतून घेतानाचे व्हिडिओ अलीकडे सोशल मिडियावर प्रसिद्ध होताना दिसत आहेत. या सामाजिक कार्यात बॉलीवूडकरही मागे राहिलेले नाहीत. पाहा अशाच काही सेलिब्रेंटीचे व्हिडिओ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा