आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करता येते असे म्हटले जाते. आता बॉलिवूडमधील एका जेष्ठ अभिनेत्रीला देखील असेच काहीसे करायची इच्छा आहे. त्यांची इच्छा ऐकून सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसेल. पण खुद्द या अभिनेत्रीने एका शो दरम्यान हे वक्तव्य केले आहे. या अभिनेत्रीचे नाव वहीदा रहमान असे आहे. वहिदा यांना स्वत:च्या वयाचा विचार न करता स्कूबा डायव्हिंग करण्याचा आनंद लुटायचा आहे.

नुकताच अभिनेत्री ट्विंकल खन्नाने एक नवा शो सुरु केला आहे. या शोमध्ये वहीदा रहमान यांना बोलवण्यात आले होते. दरम्यान वहीदा यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ट्विंकलने वहीदा यांना त्यांच्या बकेट लिस्टबद्दल विचारले होते. या बकेट लिस्टमध्ये स्कूबा डायव्हिंगचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मला माझे वय विसरुन स्कूबा डायव्हिंग करण्याची तिव्र इच्छा असल्याचे वहीदा म्हणाल्या. त्यावर ट्विंकलने आश्चर्यचकित होऊन तुम्ही वयाच्या ८१व्या वर्षी स्कूबा डायव्हिंग करणार? असा प्रश्न वहीदा यांना विचारला.

ट्विंकल खन्नाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर या शोदरम्यानचा १४ सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ट्विक इंडिया शोदरम्यानचा आहे. हा व्हिडीओ शेअर करत ट्विंकलने छान असे कॅप्शनही दिले आहे.

Story img Loader