गेल्या काही वर्षांपासून युट्यूबचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारलं आहे. नवनवीन संकल्पना, त्या सादर करण्याची पद्धत, तरुणाईला त्यांच्याच पद्धतीने काही विषय समजावून सांगण्यासाठी केला जाणारा आटापिटा या साऱ्यातून जन्माला आले ‘युट्यूबर’. कोणी महागड्या गाड्यांविषयी माहिती देणारे युट्यूब चॅनल सुरु केले, तर कोणी भटकंतीविषयी माहिती देणारे चॅनल सुरु केले. विविध संकल्पनांना प्रभावीपणे सादर करण्याच्या या उत्साही वातावरणात एक अशी युट्यूबर नावारुपास आली जिने सर्वांचेच लक्ष वेधण्यात यश मिळवले ती म्हणजे ‘ढिंच्याक पूजा’.

10 years of Jab We Met वाचा : ‘मौजा ही मौजा’नंतर गीत, आदित्यचं काय झालं?

‘सेल्फी मैने लेली आज’, ‘दिलों का शूटर है मेरा स्कूटर’, ‘बापू दे दे थोडा कॅश’ ही विचित्र गाणी तिने आजवर गायली आहेत. ही गाणी विचित्र असली तरीही युट्यूबवर ती सर्वाधिक व्ह्यूज मिळवणारी ठरत आहेत. अशा या युट्यूब सुपरस्टारवर खुद्द बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याने प्रतिक्रिया दिली आहे. आमिरची निर्मिती असलेला ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने मुलाखत देताना त्याने ढिंच्याक पूजावरही भाष्य केले.

TOP 10 NEWS वाचा : दीपिकाच्या घुमर नृत्यापासून ते असिनच्या कन्यारत्नापर्यंत सर्व घडामोडी एका क्लिकवर

युट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध मिळवणाऱ्या मुलीला आमिर तिचे कौशल्य सादर करण्यासाठी मंच मिळवून देतो, अशी कथा ‘सिक्रेट सुपरस्टार’मध्ये दाखवण्यात आली आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही नावलौकिक मिळवू शकता, असा विचार वैयक्तिक आयुष्यातही करणाऱ्या आमिरला मुलाखतीत ढिंच्याक पूजाबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्याने आश्चर्यचकित करणारी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, पूजा जैन (ढिंच्याक पूजा) नावाची मुलगी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचे मला कळले. ती एक चांगली गायिका नाही तरीही तिला प्रसिद्धी मिळतेय असेही मला सांगण्यात आले. पण असं कसं होऊ शकतं, असा विचार माझ्या मनात आल्यामुळे मी तिची ‘दिलों का शूटर’ आणि ‘सेल्फी मैंने ले ली आज’ ही गाणी ऐकली. पूजा सर्वांपासून हटके असल्यामुळेच ती एवढी प्रसिद्ध होत असल्याचे मला तिची गाणी ऐकल्यानंतर कळले. लोकांना अशीच गाणी ऐकण्यात मजा येते. त्यामुळे ती जर सोशल मीडियावर हिट होत असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही.

ट्विटर आणि फेसबुकवर ढिंच्याक पूजाच्या गाण्यांना मोठी पसंती मिळत असून यामुळे तिच्या आर्थिक उत्पन्नात मोठी भर पडत आहे. काही दिवसांपूर्वीच एका प्रसिद्ध वेबसाइटने तिच्या उत्पन्नाचा अहवाल सादर केला होता. सध्या पूजा बिग बॉसच्या घरात तिची ढिंच्याक गाणी गात आहे.

Story img Loader