छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आमना शरीफचा आज १६ जुलै रोजी वाढदिवस आहे. आमनाला ‘कहीं तो होगा’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. या मालिकेत आमनाने कशिशची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे आमना एका रात्रीत लोकप्रिय झाली. या मालिकेनंतर आमनाने कधीच पाठी वळून पाहिले नाही. आमना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहीली आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्या लग्ना विषयी एक खास गोष्ट जाणून घेऊया.

आमना फ्रिल्म डिस्ट्रीब्यूटर आणि निर्माते अमित कपूर यांच्यासोबत एक वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २७ डिसेंबर २०१३ मध्ये त्यांनी लग्न केले. आमना मुस्लीम आणि अमित हे हिंदू त्यामुळे आमनाने लग्नासाठी हिंदू धर्म स्वीकारला होता.

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
aarti singh wedding rumors (1)
लाल साडी, केसात गजरा अन् घरी सजावट! गोविंदाच्या भाचीच्या लग्नाची तयारी सुरू, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

आणखी वाचा : ‘तुला हे करावं लागेल…’, ‘मोमो’ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

आणखी वाचा : ‘माणूसकी आहे की नाही?’, ड्रायव्हरला पावसात भिजू दिल्याने सुझान आणि ताहिरा झाल्या ट्रोल

आमनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, छोट्या पडद्यावर येण्या आधी आमनाने चित्रपटामध्ये काम केले होते. आमनाने चित्रपटातील करीअरची सुरुवात ही तामिळ चित्रपट ‘जे जंक्शन’ने केली होती. त्यानंतर आमनाने ‘कहीं तो होगा’ ही मालिका केली. ही मालिका संपल्यानंतर आमनाने पुन्हा एकदा मोठ्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमना ‘आलू चाट’, ‘आओ विश करें’, ‘शक्ल पे मत जा’, ‘एक विलन’, ‘रूही’ या चित्रपटांमध्ये दिसली. आमनाला चित्रपटांमध्ये एवढी लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर तिने पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळतं ‘कसौटी जिंदगी की 2’ ही मालिका केली.