काल दुपारी वांद्रे येथील ‘ला मेर’ इमारतीला आग लागली होती. या इमारतीत ऐश्वर्या राय बच्चनचे माहेर असून आजही ऐश्वर्याची आई वृंदा राय इथे राहतात. जेव्हा इमारतीला आग लागल्याचे ऐश्वर्याला कळले तेव्हा आईच्या काळजी पोटी तिने लगेच आईच्या घरी धाव घेतली. यावेळी तिच्यासोबत अभिषेकही होता. दोघांचे आईसोबत इमारतीजवळ उभे असतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ही आग इमारतीच्या १० व्या आणि ११ व्या मजल्यावर लागली होती. याच मजल्यावर सचिन तेंडुलकरची सासुरवाडी आहे तर ऐश्वर्याची आई इमारतीच्या १२ व्या मजल्यावर राहते.
https://www.instagram.com/p/Baoa39Qh1Al/
https://www.instagram.com/p/Bap4GEQhqJh/
वांद्रे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता शिंदे यांनी सांगितले की, ‘जेव्हा इमारतीला आग लागली तेव्हा सचिनचे सासरे ११ व्या मजल्यावर त्यांच्या घरीच होते. पण नंतर ते आपल्या नोकराच्या मदतीने सुखरुप इमारतीच्या बाहेर आले. या घटनेत कोणालाही इजा झाली नसून सर्व सुखरूप आहेत.’ ऐश्वर्याची आई तिच्यासोबत सावलीसारखी असते. ऐश्वर्याच्या करिअरच्या सुरूवातीपासून आई तिच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आईच्या चिंतेमुळे कासावीस झालेल्या ऐश्वर्याने लगेच आईला भेटण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.
https://www.instagram.com/p/BaooPjmDaDw/
https://www.instagram.com/p/BaoUT2Lhlwx/
https://www.instagram.com/p/BaoNIBXnkVS/
इमारतीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाले आणि काही वेळाने ही आग आटोक्यातही आणली गेली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले होते.