सुखाचा संसार करायचा असल्यास पत्नीच्या स्वयंपाक कौशल्याबद्दल काहीच न बोलता ती जे खायला देईल ते निमूटपणे खावं असं म्हटलं जातं. आपल्या नावडत्या भाजीबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाल्याने अभिषेक बच्चनला चांगलीच शिक्षा मिळाली आहे. कारण तीच भाजी पत्नी ऐश्वर्या राय बच्चनने त्याला खाऊ घातली आहे.

अभिषेक बच्चनला ब्रोकोली broccoli अजिबात आवडत नाही. म्हणूनच त्यासंदर्भातली एक पोस्ट शेअर करत त्याने ट्विटरवर नापसंती व्यक्त केली. हीच पोस्ट ऐश्वर्याने पाहिली आणि ब्रोकोलीचीच एक डिश त्याला खाऊ घातली. ‘पत्नीने माझी आधीची पोस्ट वाचली वाटतं,’ असं कॅप्शन देत अभिषेकने त्या डिशचा फोटो पोस्ट केला.

अभिषेकने हा फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला खाण्याबाबत बरेच सल्ले दिले. तर काहींनी पत्नी जे खाण्यास देईल ते निमूटपणे खाऊन त्यातच आनंद मानायला हवा असंही म्हटलं.