ज्येष्ठ अभिनेते-चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. ईटीटाइम्सच्या वृत्तानुसार महेश मांजरेकर उपचारांनतर पुन्हा घरी परतले आहेत. १० दिवसांपूर्वी महेश मांजरेकर मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. महेश मांजरेकर यांची प्रकृती आता ठिक आहे.

महेश मांजरेकर यांनी मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. ‘वॉन्टेड’, ‘रेडी’, ‘दबंग’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’ आणि ‘कांटे’ यारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

 

हे देखील वाचा: “तालिबान्यांची बहीण बनून त्यांना चोप देईन आणि…”; अफगाणिस्तानमधील महिलांच्या स्थितीवर अभिनेत्री म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वास्तव’ सिनेमातून महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केलं असलं तरी २००२ सालामध्ये आलेल्या ‘काटे’ या सिनेमामुळे मांजरेकर यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर अभिनेता म्हणून देखील महेश मांजरेकर यांचा प्रवास सुरु झाला. ऑस्कर पुरस्कार प्राप्त ‘स्लमडॉग मिलेनियर’ या सिनेमातही महेश मांजरेकर यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

महेश मांजरेकर यांनी नुकताच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘व्हाईट’ या सिनेमाची घोषणा केली आहे. यासोबतच लवकरच महेश मांजरेकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाची निर्मिती करत आहेत.