काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला करोनाचा संसर्ग झाला होता. कार्तिकला करोनाची लागण झाल्याने तो होम क्वारंटाइन होता. त्यानंतर नुकतीच एक पोस्ट शेअर करत कार्तिकने त्याची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे चाहत्यांना सांगितले होते. आता कार्तिकने एक महागडी कार खरेदी केल्याचे समोर आले आहे.
करोनातून बरा होताच कार्तिकने स्वत:लाच एक सुंदर भेट दिली आहे. कार्तिकने एक महागडी गाडी खरेदी केली आहे. कार्तिकने लेम्बोर्गिनी उरस ही महागडी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ३.४ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे त्याने खास इटलीवरून ही गाडी मागवली असून त्यासाठी ५० लाख रुपये टॅक्स भरला आहे. काळ्या रंगांच्या या लेम्बोर्गिनीने सध्या सगळ्यांचे लक्ष वेक्षले आहे.
View this post on Instagram
लवकरच कार्तिक ‘भुलभुलैय्या’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा आडवणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटा तब्बू देखील भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. तसेच त्याचा ‘धमाका’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या भूमिकेचे नाव अर्जुन पाठक आहे.