बॉलिवूडमध्ये ‘हंगामा’, ‘क्यों की’ या चित्रपटांमधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री रिमी सेन ‘बिग बॉस ९’ या रिअॅलिटी शोमध्ये शेवटची दिसली होती. त्यानंतर ही अभिनेत्री आता पुन्हा चर्चेत आली आहे. रिमीने राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल टाकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरित होऊन तिने हा निर्णय घेतल्याचे कळते.

वाचा : आराध्यासाठी ‘पझेसिव्ह’ असलेल्या अभिषेकने केले हे काम…

भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने रिमीला पश्चिम बंगालमध्ये कार्यरत राहण्याची विनंती केल्याचे समजते. तसेच, तिला पक्षातून निवडणुकीचे तिकीट देण्याचा हेतूही असल्याचे कळते.

वाचा : ‘किडनी दिल्याबद्दल मी तिची ऋणी राहीन’; ‘या’ गायिकेने मानले मैत्रिणीचे आभार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘शागिर्द’ चित्रपटात रिमी अखेरची झळकली. ‘हंगामा’ या २००३ साली आलेल्या चित्रपटाने तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटाने तिला चित्रपटसृष्टीत नावाजले गेले. ‘धूम’, ‘क्यों की’, ‘गोलमाल’ सीरिज या हिट चित्रपटांमध्येही तिने काम केले. सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांसारख्या बड्या कलाकारांसोबत काम करूनही रिमीला करिअरमध्ये फार यश मिळाले नाही. ‘बुधिया सिंह बोर्न टू रन’ (२०१६) चित्रपटाची तिने निर्मितीही केली होती.