सध्या भोंदूबाबांचे स्तोम किती माजले आहे हे काही नव्याने सांगायला नको. लोकांच्या मनोकामना पूर्ण करण्याचे वचन देऊन त्यांना लुबाडणाऱ्या बाबाबुवांवर अनेक चित्रपट आल्याचेही पाहायला मिळाले. असाच एका भोंदूबाबा आपल्याला ‘माझा एल्गार’ या आगामी चित्रपटात पाहावयास मिळणार आहे. घरातच अभिनयाचे बाळकडू लाभलेल्या अभिनेता स्वप्निल राजशेखर याने आजवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. नायक, खलनायक तर कधी चरित्र व्यक्तिरेखांमध्ये दिसणारा स्वप्निल ‘माझा एल्गार’मध्ये नव्या रूपात दिसणार आहे.

वाचा : फिल्मफेअर पुरस्कार (मराठी) २०१७ विजेत्यांची संपूर्ण यादी

Why was Harvey Weinstein conviction overturned in the MeToo case
#MeToo प्रकरणातील अत्याचारी हार्वे वाइनस्टीन यांची शिक्षा रद्द का झाली? चळवळीला धक्का बसणार?
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?

या चित्रपटाने स्वप्निलला पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाचा कस लावणारी भूमिका दिली आहे. स्वप्निलने यात एका साधूची भूमिका साकारली असून, वरवर पाहता जनतेच्या हिताची कामे करणारा हा साधू खरंतर या चित्रपटाचा खलनायक आहे. गरिब शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणे आणि आध्यात्मिकतेच्या नावाखाली बुवाबाजी करणे हा महंत महाराजचा खरा धंदा असतो. या व्यक्तिरेखेला स्वप्निल योग्य न्याय देऊ शकेल असे वाटले आणि त्याने होकार दिल्याने मनाजोगत्या कलाकारासोबत काम करण्याचे समाधान लाभल्याचे दिग्दर्शक मिलिंद कांबळे म्हणाला.

महंत महाराजाच्या भूमिकेसाठी स्वप्निलने वेगळा गेटअप केला आहे. पांढरा पोषाख, कमरेला उपरणं, लांब केस, कपाळावर सूर्यरूपी कुंकू, गळ्यामध्ये रूद्राक्षांच्या माळा, दोन्ही हातांच्या बोटांमध्ये अंगठ्या, हाती जपमाळा अशा अवतारात तो या चित्रपटात दिसणार आहे. वाचिक अभिनयासोबतच नेत्रअभिनयाद्वारे स्वप्निलने या व्यक्तिरेखेत गहिरे खलनायकी रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचा : ‘देशासाठी मी काय करावे हे मला दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही’

ऐश्वर्या राजेश, यश कदम, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गंधार जोशी, प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन, डॉ भगवान नारकर आदि कलाकारांनी या चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक मिलिंद यानेच ‘माझा एल्गार’ चित्रपटाची कथा लिहिली असून, पटकथा आणि संवाद चेतन किंजळकरचे आहेत. येत्या १० नोव्हेंबरला ‘माझा एल्गार’ प्रदर्शित होईल.