‘टार्झन: द वंडर कार’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता वत्सल सेठ नुकताच विवाहबंधनात अडकला. मुंबईतील इस्कॉन मंदिरात त्याने अभिनेत्री इशिता दत्ताशी लग्न केले. ‘दृश्यम’ या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या इशिताला वत्सल गेल्या काही महिन्यांपासून डेट करत होता. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थित अगदी साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.
‘लाइफ ओके’ वाहिनीवरील ‘रिश्तों का सौदागर बाजीगर’ या मालिकेत हे दोघे एकत्र भूमिका साकारत होते. तेव्हापासूनच हे दोघे डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र दोघांनीही कधीच उघडपणे नात्याचा स्वीकार केला नाही.
https://twitter.com/aaron_pereira94/status/935500785390985217
https://twitter.com/aaron_pereira94/status/935496581758857216
इशिताचा आगामी चित्रपट ‘फिरंगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये ती कॉमेडीयन कपिल शर्मासोबत भूमिका साकारणार आहे.