तौते चक्रीवादळाचा देशातील अनेक राज्यांना मोठा फटका बसला आहे. केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांना या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. तर हे वादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असून त्याने सध्या रौद्ररूप धारण केलंय. अभिनेता राजीव खंडेलवालने गोव्यामधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत या वादळामुळे झालेल नुकसान स्पष्ट दिसतंय.

राजीव खंडेलवालने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात मेणबत्ती पेटलेली दिसतेय. त्याच्या शेजारी चेस ठेवलेला आहे. या पोस्टमध्ये तो म्हणाला आहे,” लक्षात आहे जेव्हा लाईट नसायची तेव्हा मेणबत्ती असायची. तौते चक्रीवादळानंतरचे परिणाम ”

तर राजीवने त्याच्या दुसर्‍या ट्विटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. यात चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान दिसून येतंय. यात तो म्हणालाय, ” मला खात्री आहे की ते पुन्हा उभे राहतील. गोव्याहून” असं तो पोस्टमध्ये म्हणाला आहे राजीवने शेअर केलेल्या फोटो झाडांची पडझड झाल्याचं स्पष्ट दिसतंय.

वाचा: अभिनेत्री दिया मिर्झाने गरोदर महिलांना दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती; करोना लस घेण्याचा विचार करताय तर…

मंगळवारी पहाटे तौक्ते वादळ गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील पोरबंदर आणि माहुवा किनाऱ्यांना धडकण्याआधी अती तीव्र स्वरुपाचे म्हणजेच व्हीएससीएस प्रकारचे वादळ असेल. हे वादळ जेव्हा गुजराच्या किनारपट्टीला धडकेल तेव्हा त्याचा वेग १५० ते १६० किमी प्रती तास इतका असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. वादळामुळे गुजरातमधील कच्छ, सौराष्ट्र, पोरबंदर, जुनागढ, भावनगर, अहमदाबाद, सुरत, वलसाड, अमरेली, आनंद आणि भरुच या १२ जिल्ह्यांबरोबरच दिवमध्येही मोठ्याप्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आहे.