छोट्या पडद्यावरली ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री सना खानने चित्रपटसृष्टीला निरोप दिला आहे. सनाने चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला असला तरी ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. सना अनेक वेळा सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत असते. दरम्यान, सनाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे सना ट्रोल झाली आहे.
सनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनाने हिजाब परिधान केला आहे. सनाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तिची स्तुती केली आहे. तर अनेकांनी सनाने हिजाबमध्ये फोटो शेअर केल्याने ट्रोल केले आहे. मात्र, सनाने एका नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे. एका नेटकऱ्याने सनाला प्रश्न विचारला की “एवढं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कष्ट करण्याचा काय फायदा सगळ्यांसारखं पडद्याच्या मागेच रहायच आहे.”
View this post on Instagram

या नेटकऱ्याला उत्तर देत सना म्हणाली, “जेव्हा मी पडद्यात राहून माझा व्यवसाय करु शकते, माझे सासू-सासरे आणि नवरा खूप चांगले आहेत, मग मला आणखी काय पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्लाह माझे संरक्षण करतो. आणि मी माझे शिक्षण पूर्ण केले आहे. तर यात माझाच विजय आहे की नाही?”
“लाज वाटत नाही का”, मालिकेतील संस्कारी सुनेचा बिकीनी अवतार पाहून चाहते संतप्तआणखी वाचा :
दरम्यान, सनाने गेल्या वर्षी इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडली आहे. यानंतर सनाने गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला.