निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने काही महिन्यांपूर्वी रेडिओवर पदार्पण केलं. त्यानंतर आता एका शोच्या निमित्ताने अभिनेत्री शिल्पा शेट्टी रेडिओवर पदार्पण करणार आहे. महाभारतातील द्रौपदीच्या व्यक्तिरेखेला ती आवाज देणार आहे.

याबद्दल शिल्पा म्हणाली की, ‘लहानपणी मी बीआर चोपडा यांचा टेलिव्हिजवर येणारा महाभारत हा शो पाहायची. अध्यात्मिक गोष्टींवर माझा विश्वास आहे. द्रौपदी ही अत्यंत सुंदर व्यक्तिरेखा आहे आणि या व्यक्तिरेखेला आवाज देण्यासाठी मी फार उत्सुक आहे.’

वाचा : या पाच कारणांसाठी सोनाक्षीचा ‘हॅपी फिर भाग जाएगी’ ठरणार खास 

‘ज्याप्रकारे मी लहानपणापासून पांडव आणि कौरवांची कथा ऐकत मोठी झाली आहे. त्याप्रकारे आता माझ्या मुलानेही त्यांची कथा माझ्याकडून ऐकावी असं मला वाटतं. माझा मुलगा वियान याला मी महाकाव्य आणि पौराणिक कथांविषयी नेहमीच सांगत असते,’ असंही तिने सांगितलं.