कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावरून तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डीने हैदराबाद येथील तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या समोरील रस्त्यावर टॉपलेस होत निषेध नोंदवला होता. श्री रेड्डीच्या या कृत्यामुळे आता तिला घर सोडावं लागणार आहे. आयएएस असलेल्या घरमालकाने तिला घर सोडण्यास सांगितलं आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तिने स्वत: ही माहिती दिली आहे.

श्री रेड्डी हैदराबादच्या हुमायून नगरात राहते. ‘माझ्या घरमालकाने मला फोन करून घर सोडण्यास सांगितलं आहे. तो एक आयएएस अधिकारी आहे. खरंच किती संकुचित वृत्तीची लोकं आहेत. मोठ्या लोकांचा खेळ आता सुरू झाला आहे,’ असं तिनं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. दरम्यान, मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (MAA) श्री रेड्डीला सदस्यत्व नाकारलं आहे. एमएएने श्री रेड्डीवर सामाजिक बहिष्कार घातला असून ९०० सदस्यांना तिच्यासोबत काम न करण्याचे निर्देश दिले आहेत.

Video: ऋषी कपूर बिग बींना म्हणतायत, ‘बच्चे की जान लोगे क्या?’

श्री रेड्डीच्या या कृत्यानंतर पोलिसांनी तिच्यावर भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम २९४ (सार्वजनिक स्थळांवर अश्लील कृत्यं करणं) या अन्वये गुन्हा दाखल केला होता. फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे तर, संपूर्ण कलाविश्वातच श्री रेड्डी सध्या चर्चेचा विषय ठरतेय.