बॉलिवूडच्या कलाविश्वात सध्या अध्ययन सुमन आणि प्रेयसी मायरा मिश्रा यांच्या अफेअरच्या चांगल्याच चर्चा रंगत आहेत. कंगना रणौतसोबत ब्रेकअप केल्यानंतर अध्ययन मायराला डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मायरा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून बऱ्याचदा ती अध्ययनसोबतचे फोटो शेअर करत असते. या फोटोमध्ये तिने स्वत:चा एक बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांना रोज डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. त्यापूर्वी ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात होते. या वीकमधील रोज डेचं निमित्त साधून मायराने स्वत:चा टॉपलेस फोटो शेअर करत चाहत्यांना रोज डेच्या शुभेच्छा दिल्या. तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून सध्या त्यावर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत.
मायराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पाठमोरी बसली असून तिने केवळ निळ्या रंगाची डेनिम जीन्स परिधान केली आहे. या फोटोला आतापर्यंत ४३ हजार २६६ लाइक्स मिळाले आहेत.
वाचा : valentine week 2020 : ‘या’ अभिनेत्यांनी आपल्या व्हॅलेंटाइनला केलं असं प्रपोज
दरम्यान, मायरा बऱ्याच वेळा सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री असून स्प्लिट्सविलाच्या ११ व्या पर्वात ती झळकली होती. अलिकडेच तिचा आणि अध्ययनचं एक व्हिडीओ साँग प्रदर्शित झालं असून यात त्या दोघांची कमालीची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.