सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींचे लाखो चाहते असतात. सोशल मीडियामुळे या सेलिब्रिटींना देखील चाहत्यांच्या संपर्कात राहता येत. मात्र अनेकदा या सेलिब्रिटींना ट्रोल व्हावं लागतं. तसचं काही नेटकरी तर या सेलिब्रिटींच्या पर्सनल मेसेज बॉक्समध्ये त्यांना मेसेज करत असतात. सेलिब्रिटींना डायरेक्ट मेसेज करून अनेक नेटकरी त्यांना विचित्र प्रश्न विचारतात. असाच अनुभव बॉलिवूडच्या तीन अभिनेत्रींनी शेअर केला आहे.

नेटफ्लिक्सवरील ‘अजीब दास्तान’ या सिनेमातील अभिनेत्री अदिती राव हैदरी, फातिमा सना शेख आणि नुसरत भरुचा यां अभिनेत्रींनी त्यांना येणाऱ्या अजीब म्हणजेच विचित्र मेसेज शेअर केले आहेत. एक व्हिडीओ शेअर करत या अभिनेत्रींनी त्यांना नेटकरी डायरेक्ट मेसेज करून कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे सांगतानाच या नेटकऱ्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिली आहेत.

या व्हीडीओत नुसरतला एका चाहत्यांने विचारलेल्या प्रश्नाने तिला हसू आवरणं कठीण झाल्याचं दिसतंय. एक युजर मेसेजमध्ये म्हणाला, ” मॅम मला लस तुमच्याच हाताने घ्यायची आहे. माझी ही इच्छा पूर्ण करा.” यावर नुसरत म्हणाली, ” माझ्या हाताने तुला लस नाही तर दुसरंच काही तरी लागेल..” असं म्हणत मी तुला कानशिलात देईन असं ती म्हणाली आहे.

तर एका युजरने अभिनेत्री फातिमा सनाला प्रश्न विचारला आहे, ” हे काय छोटे छोटे कपडे घातले आहेस? मुंबईत गरमी वाढली आहे का? की लहान मुलांच्या सेक्शनमधून शॉपिंग केली?” या युजरच्या प्रश्नाला फातिमाने सडेतोड उत्तर दिलं. ” माय गमला, माय फूल, माय बॉडी..माय रूल. समजलं का” असं उत्तर देत फातिमाने माझं शरीर माझे नियम असं म्हणत युजरची बोलती बंद केली.

वाचा: “तू पुरुषी आवाजात गाते”, सुनिधी चौहानने सांगितला संगीत दिग्दर्शकाचा ‘तो’ अनुभव

अदिती राव हैदरीला तिच्या बारीक असण्यावरून एका युजरने मेसेज केला आहे. ” तुम्ही एवढे पैसै कमावता, जरा चांगलं खात जा, गायब होशील एक दिवस.” असं युजर म्हणाला आहे. यावर अदिती म्हणाली, ” माझा आत्ताचा दिग्दर्शकही मला वजन वाढवण्यासाठी विनंती करतोय. एक-दोन किलो तरी वजन वाढव म्हणतोय. पण नाही.” असं म्हणत मी वजन वाढवणार नाही असं ती म्हणाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अभिनेत्रींनी त्यांना आलेले विचित्र मेसेच शेअर केले आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींना नेटकऱ्यांच्या विचित्र प्रश्नांचा वेळोवेळी सामना करावा लागतो.