‘आशिकी २’ या चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. या चित्रपटानंतर आदित्य व अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या अफेअरच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता आदित्य लवकरच एका मॉडेलशी साखरपुडा करणार असल्याचं कळतंय.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार मॉडेल दिवा धवन हिच्यासोबत आदित्य पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार आहे. तर पुढच्या वर्षी हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं समजतंय.

आदित्य व दिवाने कधीच त्यांचं नातं प्रसारमाध्यमांसमोर स्वीकारलं नव्हतं. ”ती खूप चांगली मुलगी आहे आणि आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी एका फॅशन शोमध्ये आमची ओळख झाली होती. काही वेळा डिनरलासुद्धा एकत्र गेलो आणि त्यामुळेच आम्ही डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं,” असं आदित्य ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये म्हणाला होता.

aditya and diva
आदित्य रॉय कपूर व दिवा धवन

आणखी वाचा : ”माझ्या कुटुंबाची पाळंमुळं पाकिस्तानात”; सोनमच्या वक्तव्यावर नेटकरी भडकले

दिवा ही प्रसिद्ध मॉडेल असून फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा, जे.जे. वलाया आणि तरुण ताहिलियानी यांच्यासाठी तिने रॅम्प वॉक केला आहे. दिवाचा जन्म अमेरिकेत झाला असून न्यूयॉर्कमधील काही चॅरिटी शोसाठीही तिने रॅम्प वॉक केला आहे.