अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. सत्तांतरण केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देखील देश सोडला आहे. उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडला आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये भायानक चित्र आहे. तालिबानच्या वर्चस्वामुळे पुन्हा एकदा संकट निर्माण झालं आहे. देशातील नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचं चित्र आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर अफगाणी चित्रपट निर्माती सारा करीमीने जगाला एक पत्र लिहिले असून मदतीचे आवाहन केले आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने १६ ऑगस्ट रोजी इन्स्टाग्राम अकाऊंटवर सारा करीमीची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये साराने लोकांना एकत्र येऊन या विरोधात लढण्याचे आवाहन केले आहे. अनुरागने साराची पोस्ट जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्यास सांगितली आहे.

साराने पोस्टमध्ये सध्याची अफगाणिस्तानमधील परिस्थिती कशी आहे हे सांगितेल आहे. तालिबानी लोक अफगाणी महिलांवर कशाप्रकारे अत्याचार आणि जबरदस्ती करत असल्याचे म्हटले आहे. तालिबानी हे आर्टिस्ट, इतिहासकार, सरकारी नोकर, जवळपास सर्वांनाच मारत आहेत असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे सारा म्हणाली, जर तालिबानी लोकांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला तर देशातील कलेचा नाश होईल. मी आणि इतर काही चित्रपट निर्माते त्यांच्या हिट लिस्टवर आहोत. ते महिलांचे सर्व हक्क काढून घेतील. आमच्या जिवाला धोका आहे. आमच्या तोंडाला टाळा लावण्यात येईल. काही आठवड्यांमध्येच तालिबानी लोकांनी येथील शाळा उद्धवस्त केल्या. जवळपास ९० लाख मुलींचे भविष्य धोक्यात आहे.