श्रीदेवी यांच्या चाहत्यांसाठी या गोष्टीवर विश्वास ठेवणं कदाचित कठीण असेल, पण हे खरंय की जान्हवी आपल्या आईचा द्वेष करत होती. श्रीदेवी यांनी ५० वर्षांच्या करिअरमध्ये ३०० हून जास्त सिनेमांमध्ये काम केले. पण जान्हवीने मात्र त्यांचे फक्त पाच सिनेमेच पाहिले आहेत. स्वतः जान्हवीने या गोष्टीची कबुली दिली आहे.

श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी सध्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज असून, प्रेक्षकांना तिच्यात श्रीदेवी यांचीच छवी दिसते.

एका मुलाखतीत जान्हवी म्हणाली की, तिने ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘मॉम’, ‘मिस्टर इंडिया’, ‘रूप की रानी चोरों का राजा’ आणि ‘सदमा’ हे पाच सिनेमेच पाहिले आहेत. याशिवाय तिला आईचे दुसरे कोणतेही सिनेमे पाहता आले नाहीत.

२१ वर्षीय जान्हवी पुढे म्हणाली की, आईचा सदमा पाहून तिला फारच धक्का बसला होता. या सिनेमात क्लायमॅक्सला श्रीदेवी बरी झाल्यानंतर ती कमल हसनला पुर्णपणे विसरते. सिनेमाचा हा शेवट पाहून मलाला एवढा राग आला होता की मी दोन दिवस आईशी बोलतच नव्हते. आई कमल हसन यांच्यासोबत अशी वागूच कशी शकते याचा राग येऊन मी तिच्याशी दोन दिवस बोलत नव्हते.

sridevi jhanvi

जान्हवीला ‘रुप की रानी चोरों’ का राजा सिनेमा फार आवडतो. या सिनेमात श्रीदेवी यांचा डबल रोल आहे. श्रीदेवी यांचे फेब्रुवारीला निधन झाले. त्यांची मोठी मुलगी जान्हवी लवकरच धडक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धडक हा सिनेमा मराठीचा सुपरहिट सिनेमा सैराटचा रिमेक आहे.