ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाची अफवा अनेकदा सोशल मीडियावर पसरते. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची अफवा पसरली. मात्र या चर्चांना पूर्णविराम देत दिलीप कुमार यांनी शुक्रवारी काही ट्विट केले.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांचे स्वास्थ बिघडल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाच्या अफवांनंतर अनेकदा सायरा बानो ट्विट करून दिलीप कुमार निरोगी असल्याची माहिती चाहत्यांना देतात. मात्र यावेळी स्वत: दिलीप कुमार यांनी ट्विट करून आपण निरोगी असल्याची माहिती चाहत्यांना दिलीये. त्यासोबतच रमजानच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत. नवीन पँट-शर्ट घालून एक फोटोदेखील त्यांनी शेअर केलाय. ‘सायराने हा नवा पँट-शर्ट घालण्यास सांगितले,’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलाय. त्यानंतर जेवणानंतर ग्रीन टीचा आस्वाद घेतानाही एक फोटो शेअर केलाय.
https://twitter.com/TheDilipKumar/status/878292331048321024
https://twitter.com/TheDilipKumar/status/878295065092800512
VIDEO : दिलीप कुमार यांच्या नातीचा ‘शेप ऑफ यू’ तुम्ही पाहिलंत का?
आपल्या निधनाच्या अफवांवर दिलीप कुमार यांनी ट्विटरवर म्हटलं, ‘सोशल मीडियापासून मी काही दिवसांपासून दूर होतो. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांनी मी भारावलो आहे. मी आता निरोगी आणि स्वस्थ आहे. औषधांमुळे आणि उपचारामुळे मी या रमजानला उपवास करू शकत नाही. माझ्यावर आणि सायरावर देवाचा आशीर्वाद सदैव आहे. तुमच्या प्रेमासाठी मी खूप आभारी आहे.’
https://twitter.com/TheDilipKumar/status/878205878603726849
https://twitter.com/TheDilipKumar/status/878206576397438977
https://twitter.com/TheDilipKumar/status/878207880268206086
आपल्या आवडत्या अभिनेत्याला सोशल मीडियावर पुन्हा एकदा सक्रिय पाहून दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे चाहतेसुद्धा आनंदित झाले. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिलीप कुमार यांनी चाहत्यांच्या काही ट्विटना उत्तरसुद्धा दिले आहे.
वाचा : ‘या’ कलाकारांनी कामासाठी हनिमूनही ढकललं पुढे