संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाला राजपूत संघटनांचा तीव्र विरोध होत असतानाच प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता चित्रपटातील कलाकार या सर्व घटनांवर व्यक्त होणं टाळतच असल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या शारजा पुरस्कार सोहळ्यातही अभिनेत्री दीपिका पदुकोणने त्या विषयावर मौन राहणंच पसंत केलं. तर दुसरीकडे, एका कॉन्सर्टमध्ये गायिका श्रेया घोषालने प्रेक्षकांच्या आग्रहानंतरही ‘पद्मावती’मधील घुमर हे गाणं गायलं नाही.
बोरिवलीतील कोराकेंद्र मैदानात श्रेयाचं म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. सुरुवातीला ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील दिवानी मस्तानी हे गाणं गायल्यानंतर प्रेक्षकांमधून ‘घुमर’ गाण्यासाठी आवाज होऊ लागला. प्रेक्षकांचा हा आग्रह अपेक्षितच होता, कारण प्रदर्शनानंतर या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळालेला. प्रेक्षकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत श्रेयाने दुसरी गाणी गायला सुरुवात केली.
The Grand Entry of The Melody Queen @shreyaghoshal with DEEWANI MASTANI
An evening to remember #ShreyaGhoshalLiveInMumbai pic.twitter.com/WfX2zPADWf— Asif The Kiddo! (@AsifRKondkar) November 26, 2017
https://www.instagram.com/p/Bb9yDYQnxj2/
VIDEO : सनी लिओनीशी केलेली मस्करी पडू शकते महागात
राधा (स्टुडंट ऑफ द इयर), उ ला ला (द डर्टी पिक्चर), ये इश्क हाए (जब वी मेट), पिंगा (बाजीराव मस्तानी), तेरी मेरी (बॉडीगार्ड) अशी काही लोकप्रिय गाणी तिने सादर केली. त्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांमधून घुमर गाण्याची विनंती करण्यात आली. यावेळी विनंतीचा जोरही वाढला होता. पण, ‘हे क्लिष्ट नाव आहे,’ असं म्हणत तिने पुन्हा एकदा टाळलं.
https://twitter.com/dhairya_001/status/934810396149424128
‘पद्मावती’ चित्रपटावरून सुरु असलेला वाद, त्याला होत असलेला विरोध पाहता श्रेयाने त्यातील गाणं सादर करण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे.