मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा कायदेशीर घटस्फोट काल झाला. मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयाने गुरुवारी त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जास कायदेशीर मंजुरी दिली. काही दिवसांपूर्वी मलायका आणि अरबाज आपल्या १४ वर्षांचा मुलगा अरहानसोबत जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टला गेले होते. पण या कॉन्सर्टच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा १८ वर्षांचा संसार कायमस्वरूपी मोडल्याची बातमीही समोर आली. त्यामुळे मलायका आणि अरबाज घटस्फोट्याच्या निर्णयानंतर एकत्र येणार का या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला. आता मलायकाला ‘खान’दानमध्ये काहीच स्वारस्य नसल्याचे दिसते.

नुकत्याच एका कार्यक्रमात वडोद्याला मलायका गेली होती. या कार्यक्रमाला मलायका जिथे बसणार त्यासमोर मलायका अरोरा खान अशी संपूर्ण नावाची पाटी लावली होती. पण मलायकाला आपल्या नावासमोर असलेलं खान फारसं पटलं नसावं. तिने आपल्या नावापुढील खान काढून टाकण्याची मागणी केली आणि मलायका अरोरा एवढेच नाव ठेवले. असे असले तरी अजूनही तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर मलायका अरोरा खान असेच नाव आहे.

unnamed-151

unnamed-162

unnamed-172

मलायका- अरबजाचं वैवाहिक नातं संपुष्टात येण्यासोबतच आता त्यांच्या खासगी जीवनाविषयीच्या चर्चांना उधाण येत आहे. मलायकाचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं जात आहे. ते दोघं बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
घटस्फोटानंतर अरहान आईसोबत राहणार असून अरबाज अरहानला कधीही भेटू शकतो.

(छाया सौजन्यः भूपेंद्र राणा)