बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खान ओळखला जातो. आमिरचा आणि त्याची दुसरी पत्नी किरण रावचा नुकताच घटस्फोट झाला. लग्नाच्या १५ वर्षांनंतर त्याने घटस्फोट घेतला आहे. आमिरची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. आयरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याच वेळा आयरा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत येते. दरम्यान, आमिर आणि किरणच्या घटस्फोटानंतर आयरा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत दिसली आणि त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

आयराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत ती शॉपिंग करून आल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत आयराने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि प्रिंटेड प्लाझो परिधान केली आहे. नुपुरने निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. त्या दोघांनी एकमेकांचा हाथ पकडला आहे. तर आयराच्या हातात शॉपिंग बॅग आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल

आमिरच्या घटस्फोटानंतर आयरा शॉपिंगला गेल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. एक नेटकरी म्हणाला, “वडिलांच्या तिसऱ्या लग्नाच्या तयारीसाठी शॉपिंग करते.” तर काही नेटकऱ्यांनी ती ज्या पद्धतीने चालते त्यावरून तिला ट्रोल केले आहे.

ira_khan_inside_image
आयरा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली आहे.

आणखी वाचा : ‘या’ घटनेनंतर तुटली बाळासाहेब आणि दिलीप कुमार यांची मैत्री

आमिरचा घटस्फोट झाला त्यादिवशी आयराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ती म्हणाली होती की ‘पुढचा रिव्ह्यू आता उद्या. पुढे काय होणार आहे?’ वडिलांच्या घटस्फोटानंतर आयराने अशी पोस्ट केल्यामुळे ती चर्चेत आली होती.

Story img Loader