बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आलीय. अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने राज कुंद्राला अटक केलीय. या प्रकरणानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे. त्यामुळे आता पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय.

१४ वर्षांनंतर ‘हंगामा-२’ या सिनेमातून शिल्पा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज होती. त्याचसोबत ती बहुप्रतिक्षित सिनेमा ‘निक्कमा’ मधूनही महत्वाच्या भूमिकेत झळकणार होती. अशात शिल्पाचा पती राज कुंद्राच्या अटकेमुळे शिल्पाच्या दोन्ही सिनेमांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. २००३ सालात आलेल्या ‘हंगामा’ या सिनेमाचा ‘हंगामा-२’ या सीक्वल अवघ्या ३ दिवसात म्हणजेच २३ जुलैला रिलीज होणार होता. अशात राज कुंद्राच्या अटकेमुळे आता सिनेमा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढू शकतात.

Video: “ब्लाउजच घातलं नाही तर मास्क कुठून आणणार”; ‘त्या’ ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

शब्बीर खान यांच्या ‘निक्कमा’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यार जाहीर करण्यात आलेली नाही. २००७ सालामध्ये शिल्पा ‘अपने’ या सिनेमातून मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यानंतर २००९ सालात तिने राज कुंद्रासोबत लग्न गाठ बांधल्यानंतर सिनेमापासून ब्रेक घेतला. दरम्यान मधल्या काळाच शिल्पा छोट्या पडद्यावर विविध शोमध्ये जजच्या भूमिकेत झळकली. मात्र १४ वर्षांनंतर शिल्पा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज असतानाच आता तिच्या समोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

आणखी वाचा: कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पाशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.