जरी तुम्ही भारतीय टिव्ही मालिकांचे चाहते नसाल तरी तुम्हाला हे मात्र नक्कीच माहित असेल की, भारतीय मालिकांमध्ये काहीही होऊ शकतं. जे अशक्य असतं तेच सगळं काही करण्याची हिंमत या मालिकांमध्ये असते. अर्थात या निरर्थक गोष्टी बघणारा चाहतावर्गही मोठा आहे. उदाहरण म्हणून सांगायचे तर ससुराल सिमर का या मालिकेत सिमर चक्क माशी बनली होती. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल तर तुम्ही नागीण मालिकेतील नागिण आणि मुंगुस यांचे भांडण पाहिले आहे का?
PHOTOS: मान्यता, संजय दत्तचे व्हेकेशन फोटो पाहिले का?
ही दोन्ही दृश्य पाहून तुम्हाला जर वाटत असेल की याहून विचित्र असं काही असू शकत नाही. पण तुम्ही चुकताय… याहूनही विक्षिप्त प्रकार तुम्हाला अजून एका मालिकेत दिसणार आहे. सोनी टिव्हीवर ‘पेहरेदार पिया की’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता तुम्ही म्हणाल या मालिकेत असं काय आहे की याची तुलना ‘नागिण’ आणि ‘ससुराल सिमर का’ या मालिकांशी केली जात आहे.
‘ट्युबलाइट’ चित्रपटातील गोंडस माटिन रे तंगू
या दोन्ही मालिकांना मागे टाकेल अशी ही एक मालिका आहे. यात १० वर्षाच्या मुलाचे लग्न वयाने खूप मोठ्या मुलीशी झालेले दाखवण्यात आले आहे. ती फक्त १० वर्षाच्या त्या मुलाची पत्नीच असते असे नाही तर त्याची अंगरक्षकही असते. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी तिने स्वतःवर घेतलेली असते. या मालिकेचा प्रोमो पाहून तुम्हालाही या हिंदी मालिकांची किव करावीशी वाटेल यात काही शंका नाही. १७ जुलैला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ही मालिका बघताना डोके दुखीच्या गोळ्या स्वतः जवळ बाळगा म्हणजे झालं.