बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून आता याचा परिणाम शिल्पाच्या कामावर होत असल्याच दिसून येतंय.

गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर-४’ शूटिंग करणं रद्द केलंय. मंगळवारी ‘सुपर डान्सर-४’ चं मुंबईत शूटिंग पार पडणार होतं. मात्र राज कुंद्राला अटक झाल्याने शिल्पा शेट्टी शूटिंगलला पोहचली नाही. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार मंगळवारी २० जुलैला मुंबईत या शोच्या एपिसोडचं शूटिंग पार पडणार होतं. शिवाय या भागासाठी अभिनेत्री करिश्मा कपूर गेस्ट म्हणून हजेरी लावणार होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणी शिल्पा शेट्टीने तिचं शूटिंग रद्द केलं. त्यामुळे उर्वरित परिक्षकांच्या उपस्थितीत शूटिंग पार पडलं.

आणखी वाचा: राज कुंद्राच्या अटकेनंतर पूनम पांडेने सोडलं मौन म्हणाली; “मला शिल्पा शेट्टीची…”

सूत्रांच्या माहितीनुसार शोच्या टीमने आता करिश्मा कपूरलाच पुढील दोन दिवसांसाठी लॉक केलं आहे. एवढचं नाही तर शिल्पा जर शोमध्ये पुन्हा आली नाही तर करिश्मा कपूर शिल्पाच्या जागी रिल्पेस होऊ शकते. सध्या शोची मेकिंग टीम शिल्पाच्या परण्याची वाट पाहत असून शिल्पाला शूटिंगवर परतणं शक्य झालं नाही तर टीम करिश्मा कपूरशी संपर्क साधणार आहे.

हे देखील वाचा: ‘तारक मेहता…’मधील जेठालालच्या भूमिकेसाठी राजपाल यादवने दिला होता नकार, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा-२’ हा सिनेमा येत्या २३ जुलैला रिलीज हेणार होती. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून शिल्पा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. मात्र सिनेमाशीसंबधीत सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काळात सिनेमाच्या प्रमोशनसाठी जे अनेक इव्हेंट होणार होते. त्या इव्हेंटला देखील शिल्पा शेट्टी हजेरी लावू शकणार नाही.
पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी सध्या तिच्या जुहू येथील घरी बहीण शमिता आणि मुलांसोबत आहे.