सोमवारी रात्री बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी गुन्हे शाखेने राज कुंद्रासह ११ जणांना अटक केलीय.

राज कुंद्राविरोधात सबळ पुरावे उपलब्ध असून तो या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचं पोलिसांनीच्या माहितीत समोर आलंय. तसचं या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचं मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एका निवेदनात म्हंटलं आहे.

दरम्यान राज कुंद्राच्या अटकेनंतर ‘द कपिल शर्मा’ शोमधील कपिल शर्माने राजला त्याच्या उत्पन्नाबद्दल विचारेल्या एका प्रश्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रा आणि बहीण शमितासोबत हजेरी लावली असल्याचं दिसतंय. यात कपिल शर्मा राज कुंद्राला म्हणतो, “तुम्ही कधी सेलिब्रिटींसोबत फूटबॉल मॅच खेळताना दिसता, कधी फ्लाईटमध्ये, कधी शिल्पासोबत शॉपिंग करताना दिसतात. पण जरा आम्हाला देखील सांगा काही न करता तुम्ही पैसै कसे कमवता.” कपीलच्या या प्रश्नानंतर शोमध्ये एकच हशा पिकला होता.

यावेळी स्वत: राज कुंद्रा आण शिल्पा शेट्टीला देखील हसू आवरणं कठिण झाल्याचं दिसतंय. तर कपिलच्या या प्रश्नावर मात्र शिल्पाने नंतर पतीची बाजू सावरत राज कुंद्रा खूप मेहनत घेत असल्याचं म्हणाली होती. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हे देखील वाचा: पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

दरम्यान, या प्रकरणात फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. पॉर्न अ‍ॅप्स प्रकरणी त्यावेळी गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचं दिसत आहे. यासंदर्भात त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात पोलिसांकडून चित्रपट बनवणाऱ्या अनेकांची चौकशी करण्यात आली होती. सोमवारी कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सुमारे ७ ते ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी राज कुंद्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.