परदेशात असणाऱ्या बी- टाऊनच्या ‘देसी गर्ल’ची सोशल मीडियापासून ते कलाविश्वापर्यंत सर्वच ठिकाणी प्रचंड चर्चा पाहायला मिळते. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल म्हणू नका किंवा मग एखाद्या नव्या स्टाईल स्टेटमेंटबद्दल. प्रियांकाचा ट्रेंड काही केल्या सोशल मीडियापासून दूर राहत नाही असंच म्हणावं लागेल. सध्याही ही अभिनेत्री चर्चेत आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीमुळे.

अभिनयासोबतच प्रियांका इतरही बऱ्याच कामांमध्ये सक्रिय असून, सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमांमध्येही तिचा सहभाग पाहायला मिळतो. युनिसेफची सदिच्छा दूत असणाऱ्या प्रियांकाने यावेळी मोदींची भेट घेतली आणि त्यांची ही भेट नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरली. या भेटीदरम्यान प्रियांकसोबत आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आणि चिलीच्या माजी पंतप्रधान मिशेल बेकलेट यादेखील उपस्थित होत्या. माता, नवजात बालकं आणि त्यांच्या आरोग्याशी निगडीत एका परिषदेसंदर्भातच प्रियांकाने मोदींची भेट घेतली. नेटकऱ्यांसाठी या भेटीतला सर्वाधिक लक्षवेधी विषय ठरला तो म्हणजे प्रियांकाचा पांढराशुभ्र अनारकली ड्रेस.

वाचा : हॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रालाही बसली वर्णद्वेषाची झळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साधारण वर्षभरापूर्वी बर्लिन येथे पंतप्रधानांची भेट घेणाऱ्या प्रियांकाच्या तोकड्या कपड्यावरुन तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. सोशल मीडियावर या प्रकरणाला बरीच हवा मिळाली होती. पण, यावेळी मात्र या ‘क्वांटीको गर्ल’ने ही चूक प्रकर्षाने टाळल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी यावर आपलं मतही मांडलं. यावेळी पांढऱ्या रंगाच्या एम्ब्रॉयडरी असणाऱ्या बंदगळा अनारकली घालण्याला तिने प्राधान्य दिलं. तिचा हा अंदाज अनेकांचीच मनं जिंकून गेला.