बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय संगीत दिग्दर्शक म्हणून साजिद-वाजिद ही जोडी ओळखली जात होती. पण काही महिन्यांपूर्वी वाजिद खानचे निधन झाले. अनेकदा साजिद खान भाऊ वाजिदच्या आठवणीमध्ये भावूक झाल्याचे दिसते. वाजिदच्या निधनानंतर साजिदच्या कामाच्या क्षमतेवर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. पण आता साजिदने सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटातील दोन गाणी कंपोज केल्यानंतर सर्वांना उत्तर दिले आहे.

साजिदने नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. तेव्हा तो म्हणाला, ‘वाजिद गेल्यानंतर माझ्या कामाच्या क्षमतेवर अनेकांनी शंका घेतली. एक वेळ अशी होती की मला देखील असेच वाटत होते. मी प्रचंड घाबरलो होतो आणि भविष्यात काय होणार याची चिंता वाटत होती. पण नंतर मी विचार केला की आम्ही इतक्या मेहनतीने मिळवलेल्या गोष्टी मी इतक्या सहजपणे जाऊ देऊ शकत नाही. याची पहिली पायरी म्हणजे सलमान भाईचा आत्मविश्वास परत मिळवणे. कारण त्याच्यासोबत आम्ही दीर्घकाळ काम केले आहे’ असे साजिद म्हणाला.

आणखी वाचा : सलमानचा ‘राधे’ पाहण्यासाठी लाखो चाहत्यांची झुंबड, Zee5चं सर्व्हर क्रॅश

पुढे साजिद म्हणाला, ‘हो मी सुरुवातीला थोडं घाबरलो होतो. पण माझ्यासोबत वाजिद आहे असे जाणवते. मला माझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे आणि मी कामावर लक्ष केंद्रीत केले आहे.’

आणखी वाचा : ‘कोणालाही न सांगता तिने…’, साजिदच्या पत्नीनेच वाजिदला केली होती किडनी दान

साजिदने ‘राधे’ चित्रपटातील दोन गाणी कंपोज केली आहेत. त्यामधील एक गाणे म्हणजे टायटल ट्रॅक साजिदने गायले असून लिहिले देखील आहे. सलमानचा राधे हा चित्रपट १३ मे रोजी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दिशा पटाणी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, गोविंदा, गौतम गुलाटी, प्रविण तरडे हे कालाकार दिसत आहेत.