अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अहान शेट्टी मॉडेल तानिया श्रॉफला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत्या. पण आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. तानियाने तिच्या इन्स्टाग्रामवर अहानसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यावर अहानने दिलेली कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
अहान व तानिया सध्या इटलीत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तिथलाच एक फोटो तानियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ‘माय रॉक’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं असून त्यावर अहानने ‘आय लव्ह यू’ अशी कमेंट केल्याचं पाहायचं मिळत आहे.
https://www.instagram.com/p/B18103bn9qi/
https://www.instagram.com/p/Br7qgPzn1Rb/
https://www.instagram.com/p/BlVzo-CgWP3/
आणखी वाचा : करण जोहरच्या घरी ड्रग्ज पार्टी?; त्या व्हिडीओवर विकी कौशलने सोडलं मौन
अहान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून दिग्दर्शक साजिद नाडियादवाला त्याला लाँच करणार आहेत. ‘RX 100’ या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये अहान मुख्य भूमिका साकारणार आहे. साजिद यांनी या चित्रपटाचे अधिकार नुकतेच विकत घेतले आहेत. ”हा चित्रपट तरुणवर्गात फार लोकप्रिय असून त्याचा हिंदी रिमेकसुद्धा तरुणाईला आकर्षित करणार अशी आशा आहे,” असं साजिद म्हणाले.
विशेष म्हणजे साजिद यांनीच सुनील शेट्टीला बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. ‘वक्त हमारा है’ या चित्रपटातून सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.