प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर गोळीबार करणाऱ्या ‘शार्प शूटर’ उस्मान खानला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. जॉन उस्मान उर्फ उस्मान खान (३५) असे या शार्पशूटरचे नाव आहे. उस्मान खान हा गँगस्टर अबू सालेमशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

उस्मान खानला पूर्व दिल्लीतील संजय तलाव परिसरातून गुरुवारी अटक करण्यात आलं. पोलिसांनी त्याला पत्नीवर गोळी झाडल्याप्रकरणी अटक केली होती. खानने विकासपुरी परिसरात ३ जून रोजी आपल्या पत्नीवर गोळी झाडली होती. तो आपल्या एका साथीदाराला भेटण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. ही माहिती मिळताच स्पेशल स्टाफचे पोलीस निरीक्षक विनय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण संधू, के. के. शर्मा आणि एएसआय सुदेश पाल यांच्यासह पोलिसांच्या पथकाने सापळा रचून उस्मानला बेड्या ठोकल्या.

वाचा : ‘रॉकी’, ‘द कराटे किड’ या चित्रपटांचे दिग्दर्शक जॉन एविल्डसन यांचं निधन

उस्मानला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने पोलिसांना दलेर मेहंदी, राकेश रोशन, अनिल थडानी यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगितले. १९९६ साली ‘मुंबईत आल्यानंतर मी गुलशन कुमार यांच्या हत्येत सामील असलेल्या वसिमला भेटलो. वसिमने माझी भेट अबू सालेमशी करून दिली. सालेमने बनावट नोटांचा धंदा करणाऱ्या आफताबशीदेखील माझी भेट करून दिली. त्यानंतर आफताबसोबत मी दुबईहून कराचीमार्गे तसेच नेपाळ आणि बांग्लादेशहूनही बनावट नोटांचा धंदा केला,’ अशी माहिती उस्मानने पोलिसांना दिली.

वाचा : अबू सालेमचा फक्त आवाज ऐकूनच प्रेमात पडली होती मोनिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कडकड्डूमा न्यायालयाने उस्मान खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. खानच्या विरोधात विकासपुरी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा ३ जून रोजी दाखल करण्यात आला होता.