सेलिब्रिटी किड्सच्या यादीत अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाच्याही नावाचाही समावेश होतो. त्याचबरोबर बिग बी यांची नात नव्या नवेली नंदासुद्धा अनेकांच्या ओळखीची झालीये. नव्या नवेली ही श्वेता नंदाची मुलगी आहे. तूर्तास नव्या बॉलिवूडचा भाग नसली तरी ती जिथेही जाईल, तिथे तिची चर्चा होते. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असून, बरेच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकत्याच मुंबईत झालेल्या ‘वोग ब्युटी अॅवॉर्ड’ सोहळ्यातही नव्याने सर्वांचं लक्ष वेधलं.

‘वोग ब्युटी अॅवॉर्ड’ सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र जेव्हा नव्याने रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली तेव्हा सर्व कॅमेरे तिच्यावर रोखले गेले. या सोहळ्यात नव्या अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन यांच्यासोबत दिसली. यावेळी मोनिषा जयसिंगने डिझाइन केलेल्या चंदेरी रंगाच्या गाऊनमध्ये नव्या अत्यंत सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे या सोहळ्याला ऐश्वर्या राय बच्चनदेखील उपस्थित होती. मात्र नव्यासमोर मामी ऐश्वर्याचा ग्लॅमरस लूकही फिका पडला असंच म्हणावं लागेल.

A Gentleman Chandralekha song: ऑफिस पार्टीमध्ये जॅकलिन-सिद्धार्थचा अफलातून डान्स

ऐश्वर्या काळ्या रंगाच्या फिश कट गाऊनमध्ये दिसली. नव्याची आई म्हणजेच श्वेता बच्चन यावेळी मोकाचीनो गाऊनमध्ये तर जया बच्चन पिवळ्या सूटमध्ये दिसल्या. श्वेता, जया आणि नव्या रेड कार्पेटवर एकत्र दिसल्या तर ऐश्वर्या या तिघींनंतर रात्री उशिरा कार्यक्रमाला आली. ऐश्वर्या या तिघींसोबत रेड कार्पेटवर का आली नाही असा प्रश्न यावेळी अनेकांच्या मनात निर्माण झाला. श्वेता, जया आणि नव्या यांना आधी पुरस्कार देण्यात होता आणि ऐश्वर्याला नंतर असंही म्हटलं जातंय. मात्र यावेळी नव्यासमोर सौंदर्यवती ऐश्वर्याही फिकी पडली अशीच प्रतिक्रिया अनेकांकडून ऐकायला मिळतेय.