ऐश्वर्या राय माझी आई आहे असे आंध्रप्रदेश येथे राहणाऱ्या २९ वर्षीय संगीत कुमारने काल सांगितले. जोवर संगीतला आई ऐश्वर्याबद्दल खरी माहिती मिळत नाही तोवर तो विशाखापट्टणमला जाणार नसल्याचे त्याने म्हटले. संगीत त्याच्या मोबाइलमध्ये ऐश्वर्याचे फोटो घेऊन फिरत आहे. डेक्कन क्रोनिकलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, संगीतला आपल्या आईची फार आठवण येतेय. ऐश्वर्याचा फोन नंबर तरी मिळावा अशी त्याची अपेक्षा आहे. तिला फोन करुन तो तिच्याशी या सर्व प्रकरणावर थेट बोलू शकेल अशी त्याची अपेक्षा आहे.
संगीतच्या सांगण्यानुसार, संगीतचे संपूर्ण बालपण विशाखापट्टनम येथील चोडवरम येथे गेले. १९८८ मध्ये ऐश्वर्या रायने आयव्हीएफमार्फत लंडनमध्ये त्याला जन्म दिला. जन्मापासूनच कुटुंबामुळे तो आपल्या आईसोबत राहू शकला नव्हता. आश्चर्य म्हणजे तेव्हा ऐश्वर्याचे वय फक्त १४ वर्षांची होती. ऐश्वर्या आणि अभिषेक हे एकत्र राहत नाहीत. त्यामुळे आईने माझ्यासोबत मंगळुरूमध्ये येऊन राहावे हीच माझी इच्छा आहे. मी तिच्यापासून २७ वर्षे दूर राहिलो आहे, पण आता तिच्यासोबतच मला राहायचे आहे.
याआधी कधीही संगीतचे ऐश्वर्याशी बोलणे झाले नाही. दोघांमध्ये कधीही संभाषण होऊ शकले नसल्याचे मुख्य कारण त्याचे नातेवाईक असल्याचे संगीत म्हणाला. त्याच्या घरातल्यांनी ऐश्वर्याबद्दल खरी माहिती कधी सांगितलीच नाही. या संपूर्ण प्रकरणात ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून धनुषचे पालक कोण यावर न्यायालयात खटला सुरू असताना आता ऐश्वर्याचे नवे प्रकरण किती पुढे जाईल हेच कळत नाही.