विक्रमफडणीसआपल्या आगामी चित्रपट ‘हृदयांतर’ द्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत असल्याचे आता सर्वांनाच माहित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आणि त्यानंतर संगीत प्रकाशनही करण्यात आले. ट्रेलरला काही काळातच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. सुपरस्टार हृतिक रोशनने ‘हृदयांतर’चा ट्रेलर लाँच केला होता. तर बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन हिने या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती लावली होती. विक्रमच्या चित्रपटासाठी खरंतर संपूर्ण बॉलिवूडच एकवटल्याचं चित्र आहे.

वाचा : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात झाला होता या अभिनेत्याचा मृत्यू

विक्रमने जेव्हा ऐश्वर्याला चित्रपटाच्या संगीताविषयी सांगितले. तेव्हा ऐश्वर्याने क्षणभरही विचार न करता या चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्याला सहभागी होण्याची तयारी दाखवली होती. फॅशन डिझाइनर विक्रम फड़णीस आणि ऐश्वर्या राय बच्चनची गेली खूप वर्ष जुनी मैत्री आहे. त्यांनी काही प्रोजेक्टसवर एकत्र कामही केले आहे. त्यामुळे आपल्या मित्राच्या नव्या कामात त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ऐश्वर्यानेही मागेपुढे पाहिले नाही. काही दिवसांपूर्वीच झालेल्या संगीत सोहळ्यात ऐश्वर्या चक्क मराठीत बोलताना दिसली. मुळची तुलू भाषिक असलेली ऐश्वर्या अगदी अस्खलित मराठी बोलली नाही. पण, तोडक मोडक का होईना तिने मराठीत दोन शब्द म्हटले. संगीत सोहळ्यात ऐश्वर्याला, तू सध्या कोणता मराठी चित्रपट पाहिलास का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर ती म्हणाली की, ‘मी खरंच कोणते पिक्चर नाय बघितले.’ यासाठी तिचं विशेष कौतुक करण्यात आलं कारण तिला कोणीही मराठीत बोल असं सांगितलं नव्हतं. पण, तिला मराठीत प्रश्न विचारण्यात आल्याने तिने आपल्यापरीने मराठीत उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

वाचा : ‘आमच्यातलं नातं आता संपलंय, मला आयुष्यात पुन्हा नकारात्मकता नकोय’

‘हृदयांतर’विषयी बोलताना ऐश्वर्या म्हणालेली की, ‘हृदयांतर आयुष्य साजरं करण्याचा प्रवास आहे. पण त्याचवेळी मला असं वाटतं, हृदयांतर हा एक सुंदर, संवेदनशील आणि भावनिक चित्रपट आहे. या संगीत अनावरण सोहळ्याचा मी हिस्सा होऊ शकले ही माझ्यासाठी अभिमानाचीच बाब आहे.” तर हृदयांतरचे संगीत अनावरण ऐश्वर्याच्या हस्ते होणे हा आपल्यासाठी एक अविस्मरणीय क्षण असल्याची भावना विक्रमने व्यक्त केली होती.

यंगबेरी एण्टरटेन्मेन्ट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शनआणि टोएब एण्टरटेन्मेन्टनिर्मित ‘हृदयांतर’चित्रपट७ जुलैला प्रदर्शित होणाऱ आहे.  या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावेआणि सोनाली खरे यांच्या मुख्य भूमिकाआहेत.

Story img Loader