बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन हिने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत आपला जम बसवण्यास सुरुवात केली आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘सरबजीत’मधील तिच्या अभिनयाने ती एक ताकदीची अभिनेत्री असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. लवकरच ऐश्वर्या ‘फन्ने खान’ चित्रपटात अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्यासोबत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण झाले. पण, यानंतर ती आणखी एका खास चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. नर्गिस यांना सर्वात्कृष्ट अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या ‘रात और दिन’च्या रिमेकमध्ये ऐश्वर्या दिसू शकते. हा नर्गिस यांचा शेवटचा चित्रपट होता.

वाचा : अनुष्कापाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने केले गुपचूप लग्न?

‘मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर’ हा आजार असलेल्या महिलेच्या भूमिकेत ऐश्वर्या दिसू शकते. याविषयी निर्माती प्रेरणा अरोरा म्हणाल्या की, एका नव्या दिग्दर्शकासोबत मी या चित्रपटावर काम करणार आहे. सिद्धार्थ आणि मी संयुक्तरित्या चित्रपटाची निर्मिती करू. याविषयी संजय दत्त यांच्याशीसुद्धा चर्चा झाली आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी आम्ही ऐश्वर्याशी चर्चा करत असून, तिनेच ही भूमिका करावी अशी माझी इच्छा आहे. मात्र, अजून तिच्याकडून होकार आलेला नाही.

वाचा : हॉलिवूड अभिनेत्याने वाचली ‘भगवद् गीता’

नुकतीच ऐश्वर्या पती अभिषेकसोबत करण जोहरच्या ख्रिसमस पार्टीत दिसली होती. यावेळी त्यांच्यासोबत रणबीर कपूरही होता.