बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची दीवा आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिच्याशी २००७ साली लग्न करून अभिषेक बच्चनने लाइफटाइम अवॉर्डच मिळवला होता. तेव्हापासून, बच्चन हे आडनाव आपल्या नावापुढे लावणा-या ऐश्वर्याने त्याला साजेसे असे वर्तन केले. या लग्नामुळे बॉलीवूडमधील दोन मोठी कुटुंब एकत्र आली. लग्नाला जवळपास ९ वर्ष उलटल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेकमधील नाते एकदम घट्ट तर झाले आहेच. पण, अमिताभ आणि जया या तिच्या सासू – सास-यांचीही ती लाडकी सून झाली.
CLICKED: Aishwarya Rai Bachchan & Amitabh Bachchan On A Laugh Riot & Their Pictures Are All Heart! https://t.co/lFcwOVnww3 pic.twitter.com/1hzyAKfjSx
— Anushka Chopra (@seoanushka) January 4, 2017
सासरे अमिताभ बच्चन आणि सासू जया बच्चन यांच्यासोबतचे ऐश्वर्याचे काही फोटो सध्या सोशल मिडीयावर फिरत आहेत. नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या आपल्या सासूबाईंसह कॅमे-यात कैद झाली. ऐश्वर्याने तिच्या सासू म्हणजेच जया बच्चन यांच्या खांद्यावर डोकं ठेवलेले दिसते. जणू काही आपल्या आईच्याच खांद्यावर डोकं ठेवल्यासारखे ऐश्वर्याच्या चेह-यावरून दिसते.
#CinemaNews Aishwarya Rai Bachchan CRYING On Jaya Bachchan’s Shoulder | Candid Photo | Bollywood Unseen https://t.co/FVVfSXAbvI pic.twitter.com/nWIzu97tuD
— theneotv (@TheNeoTV) January 6, 2017
इतकेच नव्हे तर एका संस्कारी सूनेप्रमाणे ऐश्वर्या तिच्या सास-यांच्या पाया पडतानाही दिसली. हे फोटो पाहून ऐश्वर्याला सुरेख सासर मिळालं असल्याचं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
Amitabh Bachchan sir proud and aishwarya rai blessing pic.twitter.com/pGNs0zOSoI
— Haresh (@hkeshrani1) December 20, 2016
ऐश्वर्याला पुरस्कार मिळाल्यानंतर एका प्रेमळ पतीप्रमाणे अभिषेकही तिचे अभिनंदन करण्यासाठी पुढे सरसावला. स्टेजवर आपल्या पत्नीला मिठी मारून त्याने तिचे अभिनंदन केले.
A complete 'Awww' moment! #AbhiAsh share a warm hug!#SansuiColorsStardustAwards. Watch tonight, 7PM! @juniorbachchan #AishwaryaRaiBachchan pic.twitter.com/YqXRhDVERF
— ColorsTV (@ColorsTV) January 8, 2017
गेल्या वर्षी ऐश्वर्या राय बच्चनने सरबजीत आणि ऐ दिल है मुश्किल हे दोन चित्रपट केले. ऐ दिल है मुश्किलमधील ऐश्वर्या आणि रणबीर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या काही दृश्यांमुळे बच्चब कुटुंबिय नाराज असल्याची तेव्हा चर्चा होती. पण, आता हे सुंदर फोटो पाहून बच्चन कुटुंबामध्ये सर्व काही व्यवस्थित असून आता सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.