अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन मंगळवारी रात्री फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी पार्टीसाठी गेले. ऐश्वर्या आणि मनिष एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतात. या पार्टीत ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत करण जोहरही होता. एकीकडे या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना यापैकी अॅशचा एक फोटो मात्र चर्चेचा विषय ठरतोय. महत्त्वाचं म्हणजे अभिषेकने फोटोग्राफरला तिचा एक फोटो डिलिट करायला सांगितल्याचं कळतंय.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार पार्टीनंतर जेव्हा ऐश्वर्या घरी जाण्यासाठी निघाली, तेव्हा कारमध्ये बसतानाचा तिचा एक फोटो चुकीच्या अँगलने काढला गेला. अभिषेकच्या हे लक्षात येताच त्याने फोटोग्राफरला जवळ बोलावून समजावून सांगितले. त्याचप्रमाणे त्याला तो फोटो डिलिट करण्यासही सांगितले.

वाचा : ‘पद्मावती’च्या वादावर भन्साळींचं स्पष्टीकरण

ऐश्वर्याने शॉर्ट डेनिम ड्रेस घातला होता. मात्र, ज्या अँगलने तो फोटोग्राफर फोटो काढत होता, तो योग्य नव्हता. अभिषेकने वेळीच सावधानता बाळगत परिस्थितीला शांतपणे हाताळले.

ऐश्वर्या लवकरच ‘फॅनी खान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती राजकुमार रावसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अनिल कपूर यांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.