बॉलिवूडमधल्या कलाकारांइतकीच चर्चा पाहायला मिळते ती त्यांच्या मुलामुलींची. शाहरुख खानचा अबराम, सैफ अली खान तैमुर, अभिषेक बच्चनची आराध्या हे स्टारकिड्स सतत चर्चेत असतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिषेक- ऐश्वर्याची मुलगी आराध्या आणि आमिर खानचा मुलगा आझाद राम- सीतेच्या वेशभूषेत पाहायला मिळत आहेत.

आराध्या आणि आझादने शाळेतल्या नाटक स्पर्धेत राम-सीतेची भूमिका साकारली होती आणि त्याचेच काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. आराध्या आणि आझाद धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. शाळेतल्या एका नाटक स्पर्धेत दोघांनी सहभाग घेतला. यामध्ये आझादने रामाची तर आराध्याने सीतेची भूमिका साकारली आहे. अभिषेक- ऐश्वर्याच्या फॅनक्लबकडून हे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

https://twitter.com/AbhiAsh_IndoFc/status/1061324187644551168

वाचा : ‘ठग्स..’ची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला सुनील शेट्टी 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळेतल्या या कार्यक्रमाला आराध्याची आई ऐश्वर्या आणि आझादची आई किरण राव उपस्थित असल्याचं कळतंय. शाळेकडून आयोजित केलेल्या या रामलीलेत आराध्या आणि आझादने सर्वोत्तम परफॉर्म केलं. शाळेतल्या विविध स्पर्धेत हे दोघंही आवर्जून सहभाग घेतात आणि याआधीही दोघांनी स्टेजवर परफॉर्म केलं आहे.