बॉलिवूडचा ‘सिंघम’ म्हणजेच अभिनेता अजय देवगणने त्याचा मोर्चा कॉमेडी चित्रपटांकडे वळवला आहे. ‘गोलमाल अगेन’ या हॉरर कॉमेडीनंतर आता अजय एका रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री रकुल प्रीत मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फेम दिग्दर्शक लव रंजन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

रकुल प्रीत सिंह तिच्या आगामी ‘अय्यारी’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ‘अय्यारी’नंतर लव रंजनच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. रकुलने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून तिने ‘मिस इंडिया’चाही किताब जिंकला होता.

वाचा : माहिष्मती नव्हे तर आता जनतेचं रक्षण करणार कटप्पा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रोमॅण्टिक कॉमेडीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नसून यामध्ये तब्बूसुद्धा झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. तब्बू आणि अजयने ‘गोलमान अगेन’मध्येही एकत्र काम केले होते. टी- सीरिजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग मिळून याचे दिग्दर्शन करणार आहेत. १९ ऑक्टोबर २०१८ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.