बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्डच सुरू आहे. त्यातही क्रीडा विषयावरील बायोपिक असल्यास प्रेक्षकांकडून त्याला अधिक पसंती मिळते. क्रिकेट, हॉकी यांसारख्या खेळांवरील चित्रपट बॉक्स ऑफीसवर गाजले. आता बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. या चरित्रपटाची घोषणा नुकतीच झाली असून अजय त्यात फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहिम यांची भूमिका साकारणार आहे. अमित शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
‘फिफा वर्ल्ड कप’चा माहौल देशात असताना फुटबॉल खेळावर आधारित या चित्रपटाची घोषणा अत्यंत योग्य वेळी केली आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘झी स्टुडिओज’कडून ट्विटरवर यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. १९५०- १९६३ या कालावधीत सय्यद अब्दुल रहिम भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते. हा काळ भारतीय फुटबॉलचा सुवर्णयुग मानला जातो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने १९६२च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर १९५६मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच मेलबर्न ऑलिम्पिक फुटबॉल टूर्नामेंटच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. वयाच्या ५४ व्या वर्षी अब्दुल रहिम यांचं कॅन्सरमुळेनिधन झालं.
Elated and proud to announce a story never told as @ZeeStudios_ #BoneyKapoor & @freshlimefilms come together for a biopic on India’s legendary #Football coach, Syed Abdul Rahim, starring @ajaydevgn, directed by @CinemaPuraDesi, screenplay by @SaiwynQ, and dialogues by @writish. pic.twitter.com/vzaLJya67x
— Zee Studios (@ZeeStudios_) July 13, 2018
Soorma movie review: अडथळ्यांमुळे रडत बसणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा ‘सूरमा’
या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर, आकाश चावला आणि जॉय सेनगुप्ता करत असून अद्याप त्याचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. अजयसोबतच या चित्रपटात आणखी कोणाची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.