‘बिग बॉस ओटीटी’मध्ये वाद-भांडण आणि गॉसिपींगने हा शो प्रेक्षकांमध्ये जम बसवू लागला आहे. या घरातील सर्व स्पर्धक बाहेरील दुनियेपासून खूप दूर असले तरी घराबाहेरील विषयांनी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात प्रवेश करण्यास सुरूवात केलीय. राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा स्वत:ला आणि स्वत:च्या करियरला सावरण्याचा प्रयत्न करताना पाहून मनोरंजन विश्वातून तिचं कौतुक होतंय. ‘बिग बॉस ओटीटी’ च्या घरातही स्पर्धक शिल्पा शेट्टीचं भरभरून कौतुक करताना दिसून आले. तर शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीच्या बाबतीत मात्र स्पर्धक वाईट गोष्टी बोलाताना दिसून येत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी ही ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातील सर्वात जास्त चर्चेत आली स्पर्धक आहे. घरातील इतर सदस्य सुद्धा तिच्याचबद्दल गॉसिप करत असतात. इतकंच नव्हे तर ‘बिग बॉस ओटीटी’चा सुत्रसंचालक करण जोहर सुद्धा शमिता शेट्टीच्याच बाजूने असतो, अशी तक्रार घरातील इतर स्पर्धकांनी केलीय. एकीकडे शो चा होस्ट करण जोहर शमिता शेट्टीचा बचाव करताना दिसून येत असतानाच घरातील स्पर्धकांनी मात्र आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं गुणगान गायला सुरूवात केलीय.
‘बिग बॉस ओटीटी’च्या एपिसोडमध्ये स्पर्धक मिलिंद गाबा, अक्षरा सिंह आणि दिव्या अग्रवाल हे तिघे गप्पा मारताना दिसून आले. पंजाबी सिंगर मिलिंद गाबा शमिता शेट्टीबद्दल बोलताना तिला ‘डांबिस’ असं म्हटलं. यावर अक्षरा सिंहने शिल्पा शेट्टीचं कौतुक करण्यास सुरूवात केली. यावेळी अक्षरा म्हणाली, “तिची बहिण खरंच खूप चांगली आहे. म्हणूनच ती तिच्या बहिणीच्या नावामुळे प्रसिद्ध झालीय.” अक्षराचं हे बोलणं ऐकून त्यावर दिव्या अग्रवाल सुद्धा आपली सहमती दर्शवते. यावेळी दिव्या म्हणाली, “मी शिल्पा शेट्टीसोबत काम केलंय. मला माहितेय ती खूच चांगली व्यक्ती आहे.”
View this post on Instagram
यावेळी अक्षरा सिंह म्हणते, “व्यक्तीला आपली स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर थोडं नम्रपणा ठेवावा लागतो. पण शमितामध्ये तो नम्रपणा दिसत नाही.” शमिताच्या वयावर बोलताना अक्षरा म्हणते, “मी तर शमिताला फक्त ‘शरारा शरारा’ गाण्यात पाहिलंय.” त्यानंतर दिव्या अग्रवाल अक्षराला शमिता वयावरून कमेंट करण्यास रोखते. तिच्या वयावरून काही कमेंट करू नको, असं दिव्या अग्रवाल म्हणते.
View this post on Instagram
अक्षरा सिंह यापूर्वीही शमिताच्या वयावरून कमेंट करताना दिसून आली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात शमिता टार्गेट करत असल्यामुळे अक्षरा सिंहला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. दुसऱ्या ‘वीकेंड का वार’मध्ये करण जोहरने सुद्धा शमिताच्या वयावरून कमेंट करण्यावरून स्पर्धकांची शाळा घेतली होती.
शमिता शेट्टीबद्दल सांगायचं झालं तर घरातील सर्व सदस्यांसोबत तिचा क्वचितच संवाद जुळून येतोय. दिव्या अग्रवाल ही शमिताची घरातील सगळ्यात पहिली मैत्रिण ठरली होती. पण आता या दोघींमध्ये छत्तीसचा आकडा निर्माण झालाय. बिग बॉस ओटीटीच्यात शमिताचं केवळ राकेश बापटसोबत चांगली केमिस्ट्री जुळताना दिसून येतेय. हे दोघेही एकमेकांची खूपच काळजी घेताना दिसून येत आहेत.